एअर प्युरीफायर खरेदी करताना…


सध्या दिल्लीमधील भयंकर प्रदूषित वातावरणाच्या बातम्या दररोज आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. त्या प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वादाह्तच आहेत. त्यापायी लोक घरातून बाहेर पडणे देखील टाळत आहेत. प्रदूषित हवेचा त्रास सर्वच मोठ्या शहरांमध्ये जाणवतो आहे. घरामध्ये असलेली प्रदूषित हवा शुद्ध करण्यासाठी आता लोक एअर प्युरीफायर खरेदी करताना दिसत आहेत. या एअर प्युरीफायर च्या मदतीने घरातील हवेमधील धूळ, पोलन, हानिकारक वायू यांचा नायनाट करून हवा शुद्ध केली जाते. एअर प्युरीफायर खरेदी करण्याचा आपला विचार असेल, तर काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे.

आपण खरेदी करीत असलेल्या एअर प्युरीफायरची स्पेसिफिकेशन नीट बघून घ्या. म्हणजेच ज्या कारणासाठी आपण प्युरीफायर खरेदी करीत आहात, त्यासाठी लागणारे सर्व घटक त्यामध्ये आहेत किंवा नाही हे पाहून घ्या. एअर प्युरीफायर मध्ये HEPA फिल्टर असणे अनिवार्य आहे. बाजारामध्ये नकली हेपा फिल्टर लावलेले स्वस्त एअर प्युरीफायर उपलब्ध असतात. पण हे प्युरीफायर हवा शुध्द करू शकत नाहीत. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी आपण घेत असलेल्या प्युरीफायर मधील यंत्रणा खात्रीशीर आहे की नाही हे पहावे.

प्युरीफायर मध्ये अॅक्टीव्हेटेड चारकोल असणेही आवश्यक आहे. या चारकोल मुळे घरामधील किंवा ऑफिसमधील घातक वायू शोषून घेतले जातात. तसेच कोणत्याही प्रकारची दुर्गंधी हा चारकोल शोषून घेतो. तसेच प्युरीफायर घेताना त्यामध्ये प्री – फिल्टर असावा. ह्या प्री फिल्टरमुळे धुळीचे मोठे कण आधीच शोषून घेतले जातात. जर प्री फिल्टर नसेल तर धुळीचे मोठे कण सरळ हेपा फिल्टर पर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे हेपा फिल्तारची क्षमता कमी होते. हा प्री फिल्टर वेळोवेळी काढून घेऊन त्याची स्वच्छता करावी, किंवा तो जुना झाल्यास बदलून नवा फिल्टर लावावा.

आपण घेत असलेल्या प्युरीफायरचा क्लीन एअर डिलिव्हरी रेट बघून घ्यावा. हा रेट जितका अधिक, तितकी जास्त हवा शुद्ध करण्याची क्षमता जास्त असे हे गणित आहे. तसेच घराच्या किंवा ऑफिसच्या ज्या भागातील हवा शुद्ध करावयाची असेल, त्याप्रमाणे प्युरीफायर ची क्षमता विचारात घेऊनच खरेदी करावी. तसेच प्युरीफायर वापरला जाणाऱ्या ठिकाणी लोकांची आवक जावक किती आहे, तेथील दरवाजे खिडक्या सील केल्या आहेत किंवा नाही या वरही प्युरीफायर चे काम अवलंबून असते.

Leave a Comment