ही आहे दुबईची राजकुमारी, तिला आहे कार कलेक्शनचा छंद


नवी दिल्ली: दुबईत भ्रष्टाचारात सामील असलेल्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे. राजकुमार असो किंवा अन्य प्रतिष्ठीत व्यक्ती सर्वांवर कठोरपणे कारवाई केली जात आहे. नुकतेच ११ राजकुमारांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून येथील वातावरण गरम झाले आहे. तिथे अशीच एक राजकुमारी आहे जिचे नाव भ्रष्टाचा-यांच्या यादीत आले आहे. परंतु ती तपासात निर्दोष असल्याचे उघड झाले. ती आहे दुबईचे पंतप्रधान रशीद अल मकतौम यांची मुलगी शेख माहेरा.

दुबईत अनेक राजकन्या आणि राजकुमार आहेत. पण शेख माहेरा यात आपल्या जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहे. ती आपल्या लक्झरी कारसाठी प्रसिद्ध आहे. महागड्या गाड्यांचा तिला छंद आहे. तिच्याकडे लम्बोर्घिनी, रोल्स रॉयस, बीबीटी अशा शानदार गाड्यांचा ताफा आहे. क्रीडा प्रकार देखील माहेराला खूप आवडतात. तिला असे खेळ खेळताना अनेक वेळा पाहिले गेले आहे. तिला घोडेस्वारी अतिशय आवडते.

माहेरा आपल्या रॉयल लाइफसाठी प्रसिद्ध असून तिचे इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अनेक फॅन पेज आहेत. तिचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यावेळी तिचे नाव भ्रष्टाचाराच्या आरोपात घेतले गेले तेव्हा तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला होता. पण जेव्हा त्यांना हे समजले की भ्रष्टाचार सारख्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली तेव्हा तिचे चाहते फारच आनंदी होते. तिने नुकताच आपला वाढदिवस शानदार पद्धतीने साजरा केला. माहेराला घोडेस्वारीचा छंद आहे. त्यातील बरेच व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये ती कारांपेक्षा अधिक घोडे चालवत आहेत.

Leave a Comment