या अब्जाधीशाचा मुलगा राहतो भाड्याच्या घरात, स्वतः करतो सर्व कामे

लखपती, कोट्याधीश बनायला सर्वांनाच आवडेल. आपल्या वडिलांच्या संपत्तीचा आनंद घ्यावा, त्या संपत्तीचा वापर करावा, वडिलांचा उद्योग अधिक वाढवावा असे प्रत्येक मुलाला वाटत असते. मात्र रशियातील एका अब्जाधीशाच्या मुलाने आपला एक वेगळा मार्ग निवडला आहे.

अलेक्झांडर फ्रिडमॅनचे वडील मिखाइल फ्रिडमॅन हे रशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 11 व्या स्थानावर आहेत. मात्र अलेक्झांडर भाड्याच्या घरात राहतो. हा फ्लॅट रशियाची राजधानी मॉस्को येथे असून, या घराचे भाडे 35 हजार रुपये आहे. मिखाइल फ्रिडमन यांची संपत्ती 1580 कोटी डॉलर आहे.

Image Credited – Hindustan Times

अलेक्झांडर फ्रिडमॅनने सांगितले की, मी येथे जेवण बनवतो, येथेच राहतो. एकूण कायतर जे काही करतो ते सर्व स्वतः कमवलेल्या पैशांनी करतो.

लंडनमध्ये शिक्षण पुर्ण केल्यानंतर देखील त्यांने आपल्याच देशात राहण्याचा निर्णय घेतला. 19 वर्षीय अलेक्झांडरने आपला स्वतःचा एक व्यवसाय देखील सुरु केला आहे. हुक्का डिस्ट्रीब्यूटरचा उद्योग देखील त्याने सुरू केला आहे.

Image Credited – India Today

अलेक्झांडर आपल्या वडिलांच्या नावावर नाहीतर स्वतःच्या हिंमतीवर आपल्या उद्योगासाठी लोकांशी ओळख करत आहे. तो सांगतो की, मला माझ्या वडिलांनी सांगितले आहे की उद्योग व राजकारण एकमेंकाशी जोडलेले असते. त्यांनी मला हे देखील सांगितले की ते त्यांची सर्व संपत्ती चॅरिटीला देणार आहेत. त्यामुळे मला माहिती आहे की त्यांच्या संपत्तीवर माझा काहीही अधिकार नाही.

अलेक्झांडर आपल्या वडिलांकडून उद्योगासाठी सल्ला घेत असतो. तो पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याचा देखील विचार करत आहे.

Leave a Comment