पाकिस्तानचे काही मंत्री करत आहेत केजरीवालांचे समर्थन


नवी दिल्ली – काल करावल नगर येथील प्रचार सभेला संबोधित करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकस्त्र सोडले. पाकिस्तानचे काही मंत्री केजरीवाल यांचे समर्थन करत असून हे लज्जास्पद असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

केजरीवाल यांना पाकिस्तान समर्थन देत आहे. केजरीवाल यांचे दिल्लीवाले समर्थन करत नाही. अशावेळी केजरीवाल यांना पाकिस्तान समर्थन देत आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यामुळे केजरीवाल यांना त्रास होत असल्याचे आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

खोट्या घोषणा आम आदमी पक्ष देत असून संपूर्ण व्यवस्था बिघडवत आहेत. त्याचबरोबर ते नक्षलवाद्यांसोबत मिळून सुरक्षेचा भंग करत आहेत. दिल्लीच्या विकासाशी आम आदमी पक्षाला काहीच देणेघेणे नसल्याचेबी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

Leave a Comment