अक्षयच्या ‘सूर्यवंशी’मध्ये जॅकी दादाची एंट्री


रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी कॉप ड्रामा असलेल्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाची चाहत्यांना फार आतुरता आहे. अक्षय कुमार, कॅटरिना कैफ यांची जोडी या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात सिंघम अजय देवगण आणि सिंबा रणवीर सिंह यांची देखील भूमिका पाहायला मिळणार आहे. यामध्ये आता अभिनेता जॅकी श्रॉफ यांचीही एन्ट्री झाली आहे.


इन्स्टाग्राम अकाउंटवर रोहित शेट्टीने फोटो शेअर करुन याबाबतची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्याने या पोस्टमध्ये आणखी एक सरप्राईझ बाकी असल्याचे म्हटले आहे. हा रोहित शेट्टीच्या कॉप ड्रामातील ‘सूर्यवंशी’ हा चौथा चित्रपट आहे. यामध्ये गुलशन ग्रोव्हर, सिकंदर खेर, नीना गुप्ता आणि निकीतन धीर हे कलाकारही भूमिका साकारत आहेत.

‘सूर्यवंशी’ चित्रपटाची घोषणा रणवीर सिंगच्या ‘सिंबा’ चित्रपटात करण्यात आली होती. यामध्ये अक्षय कुमार डीसीपी ‘वीर सूर्यवंशी’च्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २७ मार्चला रिलीज होणार आहे.

Leave a Comment