गुन्हेगारीवर आधारित वेबसीरिजमध्ये झळकणार ‘दबंग गर्ल’


आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हाने दमदार भूमिका साकारल्या आहेत. ती आता लवकरच डिजीटल विश्वात पदार्पण करणार आहे. सोनाक्षी अ‌ॅमॅझॉन प्राईमवर गुन्हेगारीवर आधारित वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सोनाक्षीने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

इन्स्टाग्रामवर सोनाक्षीने एक फोटो शेअर केला आहे. या वेबसिरीजमध्ये सोनाक्षीसोबत गुलशन देवेय्या, सोहुम शाह आणि विजय शर्मा यांसारखे कलाकार भूमिका साकारणार आहेत. या वेबसीरिजचे दिग्दर्शन रीमा कागदी करणार आहे.

‘नवी सुरुवात’, असे कॅप्शन सोनाक्षीने या फोटोवर दिले आहे. तिने या पोस्टमध्ये डिजीटल डेब्यू करण्यासाठी उत्साही असल्याचेही लिहले आहे. सोनाक्षी काही दिवसांपूर्वीच ‘दबंग ३’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटातही तिने ‘रज्जो’ची भूमिका साकारली होती.

Leave a Comment