या वर्षाच्या अखेरीस रिलीज होणार आलिया-रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’


तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय असे कलाकार झळकणार आहेत. दरम्यान हा चित्रपट गेल्या वर्षीच रिलीज होणार होता, पण काही तांत्रिक कारणांमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. आता अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुहुर्त मिळाला आहे.


‘ब्रह्मास्त्र’च्या टीमचा एक फोटो चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केला आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती देण्यात आली आहे. ‘ब्रह्मास्त्र’चा पहिला भाग ४ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. तर, या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन आणि फॉक्स स्टार स्टुडिओज अंतर्गत करण्यात आली आहे. हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

Leave a Comment