मुकेश अंबानींच्या घरी आहे ६०० नोकरांची फौज


नवी दिल्ली: मुकेश अंबानी हे आता फोर्ब्स मॅगझिनच्या रिअल टाईम बिलियनच्या यादीत देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मुकेश अंबानींनी चीनच्या हुआय यानला ४२.१ अब्ज डॉलर्स म्हणजेच २,७३,६५० कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीसह पछाडले आहे. मुकेश अंबानी यांनी आपले जीवन राजेशाही शैलीत जगले आहे. प्रत्येकवेळी ते पार्टी देतात आणि त्यांच्या पार्टीला बॉलीवूड सेलिब्रेटी देखील आवर्जून हजेरी लावतात. मुकेश अंबानी यांच्याकडे अशा अनेक महाग गोष्टी आहेत ज्या केवळ श्रीमंत व्यक्ती खरेदी करू शकतात. तुम्हाला आम्ही आज मुकेश अंबानी यांच्याकडे असणाऱ्या महाग गोष्टींबद्दल सांगणार आहोत …

देशातील सर्वात महाग घरांपैकी एक असलेल्या अँटालिया येथे मुकेश अंबानी राहतात. त्याचे घर अल्टमाउंट, मुंबई येथे स्थित आहे. २७ मजली इमारतीत ते राहतात आणि तेथे घराच्या साफसफाई फक्त ६०० नोकर आहेत, जे घराची देखभाल करतात. या घरात १६८ कार पार्क करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. टेरेसवर तीन हेलीपॅड आहेत. त्यांच्याकडे स्विमिंग पूल आणि स्पा रूम देखील आहे.

मुकेश अंबानी बीएमडब्ल्यू 760 Li या कारमधून प्रवास करतात. जिची किंमत ८ कोटी ५० लाख असून त्यांची गाडी बुलेट प्रुफ आहे. यामध्ये बोर्ड कॉन्फरन्स सेंटर, लॅपटॉप आणि टीव्ही स्क्रीन आहे. ते सर्वत्र या कारनेच फिरतात.

मुकेश अंबानींकडे एअरबस-३१९ जेट आहे. ज्याची किंमत २४२ कोटी आहे. मुकेश अंबानी यांनी हे जेट २००७मध्ये आपली पत्नी नीता अंबानीला वाढदिवसची भेट म्हणून दिले होते. या जेटमध्ये म्युझिक सिस्टीम, उपग्रह टेलिव्हिजन आणि ऑफिस कॅबिनसह वायरलेस कम्युनिकेशनचा समावेश आहे. या एअरबसमध्ये रॉयल बेडरूम देखील आहे.

एअरबसबरोबरच मुकेश अंबानी यांच्याकडे बिजनेस जेट -२ आणि फाल्कन ९०० इएक्स देखील आहे. यामध्ये व्यावसायिक कार्यालय, बोर्डरूम आणि खाजगी बेडरुम आहे, जे कोणत्याही लक्झरी सुईटपेक्षा कमी नाही. बोईस बिजनेस जेटची किंमत ७३ मिलियन डॉलर आहे, तर फाल्कन ९०० इएक्सची किंमत ४३.३ मिलियन डॉलर आहे.

Leave a Comment