इ.स. पूर्व १०० वर्षांपूर्वी झाला लॅपटॉपचा जन्म!

laptop
आईबएम कंपनीने पहिला लॅपटॉप १९८०साली बनविला हे तर सगळ्यांनाच माहित आहे. परंतु, हे पूर्ण सत्य नाही. पूर्ण सत्य तर वेगळेच आहे. कारण पहिला लॅपटॉप १९८०साली नाही तर त्याही अगोदर बनला होता. ही धक्कादायक माहिती ग्रीसमध्ये मिळालेल्या एका प्राचीन मूर्तीमुळे समोर आली आहे. या मूर्तीवरून माहिती मिळते की, पूर्वीच्या काळी केवळ लॅपटॉपच नव्हे तर टॅबलेटचाही वापर होत असे. ही मुर्ती पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आजकालच्या जमान्यात सर्व कार्यालये आणि महत्त्वाच्या ठिकाणी लॅपटॉप, कॉम्प्यूटर किंवा टॅबलेट ही साधने वापरली जातात. त्यातही इंटरनेटमुळे या साधनांचा वापर आणखीणच वाढला आहे. कॉम्प्युटरची पूढची पीढी म्हणून लॅपटॉपची निर्मीती करण्यात आली. परंतु, आपणास वाचून कदाचीत धक्का बसेल. पहिला लॅपटॉप १९८० मध्ये नव्हे तर इ.स. पूर्व १०० वर्षांपूर्वी बनला होता. तसेच, त्या काळी त्याचा वापरही केला जात होता. पूराततत्व संशोधकांनाही ही माहिती पूढे आल्यावर धक्का बसला आहे.

दरम्यान ही मुर्ती तूटलेली फूटलेलीही नाही तर ती सुस्थितीत असून, खूपच जूनी व ऐतिहासिक आहे. या मुर्तीत स्पष्ट दिसते की, एक लहान मुलगा हातात लॅपटॉप घेऊन उभा आहे आणि ती महिला लॅपटॉपला स्पर्श करत आहे. दूसऱ्या मुर्तीत तर कमालच आहे. एक महिला स्वत:च लॅपटॉप हाताळताना दिसत आहे. या मुर्तींना पाहून संशोधकांनी निष्कर्श काढला आहे की, आजच्या मानवाचे पूर्वच आताच्य मानवापेक्षाही हूशार होते. ते तेव्हाही लॅपटॉपचा वापर करत असत.

दरम्यान, ऑस्ट्रेलियातही अशाच प्रकारची धक्कादायक माहिती काही दिवसांपूर्वी पूढे आली होती. येथील एका खोदकामात ८०० वर्षांपूर्वीची जूनी मूर्ती पूढे आली होती. ज्यात एक व्यक्ती सेलफोनचा वापर करत असलेली दिसत होती. या मुर्तीतील फोन एख्याद्या साध्या फोनप्रमानेच होता. तसेच, त्यावर लिहिण्यात आलेले शब्दही दुर्मीळ भाषांपैकीच एक होते. दरम्यान, या सर्व प्रकाराला एलियंससोबत जोडले जात आहे. मात्र, या मुर्तींमुळे संशोधकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहेत हे नक्की.

Leave a Comment