एलॉन मस्क झाले संगीतकार, शेअर केले स्वतःचे गाणे

टेस्लोचे शेअर विक्री स्तरावर पोहचल्यानंतर आणि स्पेसएक्सद्वारे 60 पेक्षा अधिक नवीन इंटरनेट सेटेलाइट लाँच केल्यानंतर आता सीईओ एलॉन मस्क संगीतकार देखील झाले आहेत. एलॉन मस्क यांनी स्पॉटीफायवर एक गाणे अपलोड केले आहे. हे गाणे त्यांनी स्वतः लिहिले व संगीत दिले आहे.

मस्क यांनी स्टुडिओमध्ये गाणे गातानाचे फोटो देखील ट्विटरवर शेअर केले. या गाण्याचे शब्द ‘डोन्ट डाउट यूर वाइब बिकॉज इट्स ट्रू, डोन्ट डाउट यूर वाइब बिकॉज इट्स यू’ असे आहेत.

टेस्लाचे सीईओ आणि चेअरमन असलेले एलॉन मस्क जगातील 23 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून, त्यांची संपत्ती 34.8 बिलियन डॉलर आहे.

Leave a Comment