स्वामीजी म्हणतात, करोनो व्हायरसपासून बचावासाठी वापरा गाईचे शेण


सध्याच्या घडीला चीन तेथे पसरलेल्या करोनो व्हायरसमुळे जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. जगभरातील शास्त्रज्ञ या व्हायरसवर उपचार शोधण्याच्या मागे आहेत. त्यातच एका स्वामीजींनी यावर अजब गजब उपाय सुचवला आहे.

हिंदु महासभेचे अध्यक्ष चक्रपाणी स्वामी यांनी या व्हायरसपासून बचावासाठी गोमूत्र आणि शेणाचा वापर करण्याचा उपाय सुचवला आहे. त्यांनी सांगितले शेण आणि गोमूत्राचे सेवण केल्याने या रोगाचा प्रभाव कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर हे करताना ओम नमः शिवाय असा जप केल्यास करोनो व्हायरसपासून त्याच बचाव होईल. यासंदर्भातील वृत्त नवभारत टाईम्सने दिले आहे.

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने करोनो व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आणीबाणी जाहिर केली आहे. शुक्रवारी या व्हायरसमुळे 213 जणांनी आपला जीव गमावला आहे, तर जवळपास 9692 जणांना याची लागण झाली आहे.

Leave a Comment