काय आहे बजेटमध्ये 8 हजार कोटींची तरतूद केलेली क्वाँटम टेक्नोलॉजी ?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज बजेटमध्ये अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. केंद्र सरकार सुरुवातीपासूनच टेक्नोलॉजी आणि डिजिटलायझेशवर जोर देत आहे. आज निर्मला सीतारमण यांनी सरकार पुढील 5 वर्षात क्वाँटम अ‍ॅप्लिकेशनसाठी 8 हजार कोटी रुपयांची खर्च करणार असल्याचे सांगितले आहे. हे टेक्नोलॉजी काय आहे जाणून घेऊया.

क्वाँटम टेक्नोलॉजी काय आहे ?

क्वाँटम टेक्नोलॉजी ही आर्टिफिशियल इंटिलिजेंसच्याही पुढील टेक्नोलॉजी आगे. क्वाँटम कॉम्प्युटिंगवर गेली अनेक दिवसांपासून काम सुरु आहे. तज्ञांनुसार, यामुळे संशोधनासाठी एक चांगला पर्याय निर्माण होईल. क्वाँटम कॉम्प्युटर हा सुपर कॉम्प्युटर पेक्षाही अधिक वेगवान असेल.

क्वाँटम कॉम्प्युटिंग अशी टेक्नोलॉजी ज्याच्या मदतीने मोठा डेटा आणि इंफॉर्मेशनला खूप कमी वेळेत प्रोसेस करता येईल. सध्याच्या डिव्हाईस आणि टेक्नोलॉजीमुळे कॉम्प्युटिंगसंबंधित कामे करण्यास अनेक वर्ष लागतात ती कामे क्वाँटम टेक्नोलॉजीमुळे खूप कमी वेळेत होतील. या नवीन प्रोसेसरच्या मदतीने नवीन औषधांचा शोध ते शहरांचे मॅनेजमेंट, ट्रांसपोर्ट यासारखी कामे सोपी होतील.

मागील वर्षीच टेक कंपनी गुगलने माहिती दिली होती की क्वाँटम कॉम्प्युटिंग रिसर्च संबंधित प्रयोगात्मक क्वाँटम प्रोससर तयार करण्यात यश आले आहे. सुपर कॉम्प्युटरच्या मदतीने जे कॅल्कूलेशन करण्यास हजारो वर्ष लागतात ते या प्रोसेसरच्या मदतीने अवघ्या काही मिनिटात शक्य होईल. याच्या मदतीने कॉम्प्युटिंग पुर्णपणे बदलून जाईल.

नवीन प्रोसेसर टेक्निक क्वाँटम बिट्स अथवा क्यूबिट्सच्या मदतीने काम करते. जे डेटा वॅल्यूला मॉडर्न कॉम्प्युटिंग भाषेप्रमाणे शून्य आणि एकच्या वॅल्यूमध्ये रजिस्टर्ड करते. गुगल, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम आणि इंटेल सारख्या कंपन्या या टेक्नोलॉजीवर काम करत आहेत.

Leave a Comment