सीतारमण यांनी मोडले अर्थसंकल्पीय भाषणांचे सर्व विक्रम

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत ऐतिहासिक बजेट सादर केले. सर्वाधिक वेळ अर्थसंकल्प भाषण देण्यासाठी हे बजेट विशेष अर्थाने गाजले. सीतारमण यांनी तब्बल 2 तास 41 तास अर्थसंकल्पीय भाषण दिले. 73 वर्षात सादर झालेल्या 91 अर्थसंकल्पीय भाषणातील हे सर्वाधिक वेळ चाललेले भाषण आहे.

अडीच तास भाषण वाचल्यानंतर देखील निर्मला सीतारमण तब्येत व्यस्थित नसल्याने अखेरची दोन पाने वाचू शकल्या नाहीत. इंदिरा गांधी यांच्यानंतर सीतारमण या दुसऱ्या महिला अर्थमंत्री आहेत, ज्यांनी सलग दुसऱ्या अर्थसंकल्प सादर केला.

सीतारमण यांच्या आधी सर्वाधिक वेळ भाषण देण्याचा विक्रम जसवंत सिंह यांच्या नावावर होता. त्यांनी 2003 साली 2 तास 13 मिनिटे भाषण दिले होते.

सर्वाधिक वेळ चाललेली अर्थसंकल्पीय भाषणे –

निर्मला सीतारमण ( वर्ष 2020) – 2 तास 41 मिनिटे

जसवंत सिंह (वर्ष 2003) – 2 तास 13 मिनिटे

अरुण जेटली (वर्ष 2014) – 2 तास 10 मिनिटे

निर्मला सीतारमण (वर्ष 2019) – 2 तास 5 मिनिटे

शब्दांनुसार सर्वाधिक दीर्घ भाषण देण्याचा विक्रम मनमोहन सिंह यांच्या नावावर आहे. त्यांनी 1991 साली अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान 18,650 शब्दांचे भाषण दिले होते. तर अरुण जेटली हे यादीत दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

शब्दांनुसार सर्वाधिक दीर्घ भाषणे –

मनमोहन सिंह (वर्ष 1991) – 18,650 शब्द

अरुण जेटली (वर्ष 2017) – 18,604 शब्द

अरुण जेटली (वर्ष 2015) – 18,122 शब्द

अरुण जेटली (वर्ष 2018) – 17,991 शब्द

अरुण जेटली (वर्ष 2014) – 16,528 शब्द

1977 मध्ये हिरुभाई एम पटेल यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सर्वात लहान 800 शब्दांचे भाषण दिले होते. मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यानंतर पी. चिदंबरम यांनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.

आतापर्यंत जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी पंतप्रधान म्हणून अर्थसंकल्प सादर केला आहे. 1970 मध्ये इंदिरा गांधी अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या होत्या.

Leave a Comment