कर्णकर्कश हॉर्नपासून सुटकेसाठी मुंबई पोलिसांनी शोधली भन्नाट कल्पना

विनाकारण हॉर्न वाजवू नये, यासाठी अनेक अभियान चालवले जातात. मात्र याचा वाहनचालकांवर काहीही परिणाम होत नाही. रेड सिग्नल असतानाही अनेकजण विनाकारण हॉर्न वाजवत असतात. मात्र आता यावर मुंबई पोलिसांनी एक हटके उपाय शोधून काढला असून, याची सर्वत्र चर्चा आहे.

मुंबई पोलिसांनी शहरातील पाच सिग्नलवर डेसिबल मीटर लावले आहेत. हे मीटर ट्रॅफिक सिग्नलशी जोडण्यात आले आहेत. या सिस्टमला अशा प्रकारे बनविण्यात आले आहे की हॉर्नच्या आवाजाची मर्यादा 85 डिसेबल पेक्षा जास्त झाल्यास, सिग्नलचा टाइमर रीसेट आपोआप रिसेट होईल. तुम्ही जेवढा अधिक हॉर्न वाजवाल, तेवढा सिग्नलचा वेळ अधिक वाढेल व तुम्हाला सिग्नल सुटण्याची वाट पाहत बसावे लागेल.

याबाबतचा एक व्हिडीओ देखील मुंबई पोलिसांनी ट्विटरवर शेअर केला असून, हा व्हिडीओ युजर्सला खूपच आवडत आहे.

मुंबई पोलिसांची ही भन्नाट कल्पना बंगळुरु सिटी पोलीस कमिश्नर भास्कर राव यांना देखील आवडली. त्यांनी ट्विट केले की, डेसिबल मीटर लावणे चांगली कल्पना आहे. आम्ही देखील हे लागू करू.

मुंबई पोलीस जेसीपी (ट्रॅफिक) मधुकर पांडे म्हणाले की, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये काही तासांसाठी याचा प्रयोग करण्यात आला होता. सीएसटी, मरीन ड्राइव्ह, पेडर रोड, हिंदमाता आणि बांद्रा टर्नर रोडवर या डेसिबल मीटरला लावण्यात आले होते.

Leave a Comment