कोण होते दीनानाथ नादिम ज्यांची कविता अर्थसंकल्पादरम्यान वाचली गेली

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी सीतारमण यांनी एका काश्मिरी कवीची कविता देखील सादर केली.

काश्मिरी भाषेत वाचलेल्या कवितेचे भाषांतर त्यांनी पुढीलप्रमाणे सांगितले –

हमारा वतन खिलते हुए शालीमार बाग़ जैसा

हमारा वतन डल लेक में खिलते हुए कमल जैसा

हमारा वतन नौजवानों के गरम खून जैसा

मेरा वतन, तेरा वतन, हमारा वतन

दुनिया का सबसे प्यारा वतन

ही कविता काश्मिरी कवी दीनानाथ नादिम यांनी लिहिलेली आहे. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारने देखील सन्मानित करण्यात आले आहे. दिनानाथ नादिम कोण आहेत, त्याविषयी जाणून घेऊया.

18 मार्च 1916 ला श्रीनगरमध्ये जन्म झालेल्या दीनानाथ नादिम यांनी काश्मिरी कवितांना एक नवीन मार्ग दाखवला. त्याची गणना 20व्या शतकातील अग्रण्य कवींमध्ये होते. त्यांनी काश्मिरमध्ये प्रगतीशील लेखक संघाची स्थापना देखील केली होती. त्यांनी केवळ काश्मिरी भाषेतच नाही तर हिंदी आणि उर्दुमध्ये देखील कविता लिहिल्या.

त्यांना कविता संग्रह सुमरनसाठी 1956 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हरिवंश राय बच्चन यांनी देखील त्यांच्या काही कवितांचे भाषांतर केले होते.

दीनानाथ नादिम स्वतःविषयी सांगायचे की, मी श्रीनगरमध्ये जन्मलो. खूप कमी वयात मला कवितांची आवड निर्माण झाली. माझ्या अनेक कविता तर अशाच नष्ट झाल्या, कारण त्या सिगरेटच्या पॉकिटावर लिहिल्या होत्या.

Leave a Comment