पारदर्शी पॉड्समधून घेता येणार जंगलातील प्राणी पाहण्याचा आनंद

उत्तर थायलंडच्या चियांग सायेन येथील अनंतरा गोल्डन ट्राइंगल एलिफंट कॅम्प अँड रिसॉर्टमध्ये जगातील पहिले ट्रांसपरंट (पारदर्शी) पॉड्स बनविण्यात आले आहेत. या पाँड्सला ‘जंगल बबल’ असे नाव देण्यात आलेले आहे. या पॉड्समध्ये राहून पर्यटकांना हत्ती आणि इतर प्राण्यांना जवळून पाहण्याचा आनंद घेता येईल.

या पाँड्समध्ये एक किंग साइज बेड, एक लिव्हिंग रुमचा समावेश आहे. हे सर्व पॉड्स वातानुकूलित आहेत.

Would sleeping under the stars, overlooking a lush green jungle and elephants, be something you’d like to do? ⠀Our…

Posted by Anantara Golden Triangle Elephant Camp & Resort on Monday, January 20, 2020

येथे राहणे मात्र थोडे महागडे आहे. दोन व्यक्तींना येथे राहण्यासाठी एका रात्रीसाठी जवळपास 35 हजार रुपये खर्च करावे लागतील.

रिसॉर्टचे म्हणणे आहे की, हे आपल्या हत्ती शिबिरासाठी जगप्रसिद्ध आहे. हत्तींच्या मदतीसाठी हे रिसॉर्ट गोल्डन ट्राइएंगल एशियन एलिफंट फाउंडेशनद्वारे सुरु करण्यात आले आहे.

Leave a Comment