225 रुपयांनी महागले गॅस सिलिंडर


नवी दिल्ली : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पआधी किंमती वाढल्या आहेत. गॅस सिलिंडरच्या किंमतीत सलग पाचव्या महिन्यात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना आता जास्त पैसे खर्च करावे लागतील. व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये 224.98 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याच वेळी देशांतर्गत घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. 224.98 रुपयांची वाढ व्यावसायिक गॅस सिलिंडरवर केली आहे. व्यापाऱ्यांना आता या वाढीनंतर व्यावसायिक सिलिंडरसाठी 1550.02 रुपये द्यावे लागतील. या वाढीव किंमती आजपासून लागू झाल्या आहेत.

कोणताही बदल घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये झालेला नाही. गॅस सिलिंडरच्या किंमती गेल्या पाच महिन्यांपासून सातत्याने वाढतच होत्या. त्याचबरोबर आज सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला आहे. म्हणजेच, 14.2 किलो सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. फेब्रुवारीमध्ये तुम्हाला 14.2 किलो सिलिंडर फक्त 749 रुपयांना मिळेल. याशिवाय ग्राहकांच्या खात्यात 238.10 रुपये अनुदान दिले जाईल.

Leave a Comment