या देशात मंत्री चक्क दारू पिऊन सादर करु शकतो बजेट

ज्या प्रमाणे एखादी सर्व सामान्य व्यक्ती आपल्या घरातील कोणकोणत्या गोष्टींवर महिन्याला अथवा वर्षाला किती पैस खर्च करायचे याचे बजेट बनवते. एकप्रकारे त्याचप्रमाणे प्रत्येक देशातील सरकार दरवर्षी तर्गत कोणत्या क्षेत्रावर वा बाबींवर किती खर्च होईल हे सादर करत असते. एका देशात मात्र मंत्री चक्क दारू पिऊन देखील बजेट सादर करू शकतो. हे वाचून तुम्हाला जरा विचित्र वाटेल, मात्र हे सत्य आहे.

या देशाचे नाव ब्रिटन असून, येथील चान्सलर बजेटच्या दिवशी दारू पिऊन देखील संसदेत बजेट सादर करु शकतो. ब्रिटनमध्ये बजेट सादर करणाऱ्या मंत्र्याला चान्सलर म्हणतात.

Image Credited – thesun

ब्रिटनचे संसद हाऊस ऑफ कॉम्सच्या नियमावलीत दारू पिऊन बजेट सादर करण्याचा नियमच आहे. यात लिहिले आहे की दारू पिऊन बजेट सादर करण्याची परवानगी केवळ चान्सलरला असते, तिही केवळ एका दिवसासाठी. हा नियम अनेक दशकांपासून चालत आल्याचे सांगितले जाते.

Image Credited – Amarujala

ब्रिटनच्या बजेटबद्दल आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे येथे बजेट सादर करण्यासाठी 100 वर्ष एकाच ब्रिफकेसचा वापर करण्यात आला होता. ही ब्रिफकेस वर्ष 1860 मध्ये ब्रिटनचे चान्सलर विलियम ग्लॅडस्टोन यांच्यासाठी बनविण्यात आली होती. या बजेट ब्रिफकेसचे नाव स्कारलेट होते.

1965 मध्ये ही परंपरा मोडत तत्कालीन चान्सलर जेम्स कॅलेघन यांनी नवीन बॅग मागवली. त्यानंतर 1997 मध्ये चान्सलर गॉर्डन ब्राउन यांनी देखील बजेट सादर करण्यासाठी नवीन बॅगेची मागणी केली.

मात्र 2011 मध्ये चान्सलर जॉर्ज ऑसबॉर्न यांनी बजेट सादर करण्यासाठी त्याच 1860 साली बनविण्यात आलेल्या 151 वर्ष जुन्या ब्रिफकेसचा वापर केला होता.

Leave a Comment