बजेटमध्ये रेल्वेसाठी करण्यात आली एवढ्या कोटींची तरतूद

दरवर्षी अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेसाठी किती कोटींची तरतूद करण्यात आली याकडे सर्वांचे लक्ष असते. दरवर्षी रेल्वेसाठी अनेक कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येते. यावर्षी देखील अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रेल्वेसाठी काही विशेष घोषणा केल्या आहेत. याविषयी जाणून घेऊया.

निर्मला सीतारमण यांनी सांगितले की देशातील 550 रेल्वे स्टेशनव वाय-फाय सुविधा सुरु करण्यात येईल. यासोबतच 27 हजार किमी रेल्वे ट्रॅकचे इलेक्ट्रिफिकेशन करण्यात येईल.

4 रेल्वे स्टेशन्सचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. रेल्वे रुळाच्या बाजूला सोलर पॉवर ग्रिड बसवण्यात येणार असून, तब्बल 150 रेल्वे सार्वजनिक-खाजगी भागिदारीद्वारे सुरु करण्यात येतील. सध्या सुरु असलेली खाजगी रेल्वे तेजसप्रमाणे अनेक रेल्वे सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे. या रेल्वे पर्यटन स्थळांशी जोडल्या जातील.

बंगळुरु उपनगरात 148 किमी रेल्वे सिस्टम तयार करण्यात येणार असून, यासाठी केंद्र सरकार 25 टक्के गुंतवणूक करेल. या सर्वांसाठी सरकार 18 हजार 600 कोटी रुपये खर्च करणार आहे.

रेल्वेमध्ये खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी अनेक पाऊले उचलण्याची शक्यता होती. त्याचप्रमाणे सरकारने घोषणा केली आहे. सार्वजनिक-खाजगी भागिदारी (पीपीपी) मॉडेलद्वारे रेल्वेमध्ये खाजगी गुंतवणूक वाढवणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

Leave a Comment