या अ‍ॅन्टिनाद्वारे सर्वात प्रथम मिळाला होता टायटॅनिक बुडाल्याचा संदेश

आज मोबाईलवर आपण हजारो किमी दूर असलेल्या लोकांशी संवाद साधू शकतो. वायरलेस सेटद्वारे तारेशिवाय लांब असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधणे सहज शक्य होते. मात्र तुम्हाला माहिती आहे विना तारेचे संदेश पाठवण्याची सुरुवात कोणामुळे झाली ? या शास्त्रज्ञाचे नाव गुल्येल्मो मारकोनी आहे. इटलीचे गुल्येल्मो मारकोनी यांनीच रेडिओ टेलिग्राफची सुरुवात केली होती.

इटलीच्या बोलोना शहरात राहणारे मारकोनी यांनी रेडिओ टेलिग्राफचा शोध लावला होता. पहिल्या अटलांटिक महासागराच्या पलिकडे रेडिओ संदेश 119 वर्ष आधी म्हणजेच 1901 मध्ये पाठवण्यात आला होता. हा संदेश इंग्लंडमधील पोल्ढू नावाच्या ठिकाणावरून कॅनडाच्या सेंट जॉन्स शहराजवळील एका पर्वतीय ठिकाणी पाठवण्यात आला होता.

उत्तर अटलांटिक महासागर स्थित या ठिकाणाला मारकोनी यांनी विचार करुन निवडले होते. इंग्लंडच्या जवळ अमेरिका महाद्वीपामध्ये असे एखादे ठिकाण त्यांना हवे होते. इंग्लंडच्या पोल्ढूमध्ये वैज्ञानिक दररोज मशीन घेऊन संदेश पाठवण्याचे काम करायचे.

तर दुसरीकडे सेंट जॉन्समध्ये मारकोनी यांनी अ‍ॅन्टिना लावण्यात यश मिळवले. यावेळी इंग्लंडवरून दररोज मारकोनी यांना रेडिओ संदेश पाठवले जात असे. अखेर मारकोनी यांना त्यात यश आले. डिसेंबर 1901 मध्ये इंग्लंडवरून पाठवण्यात आलेला इलेक्ट्रो मॅग्नेटिक संदेश अटलांटिकाच्या पलीकडे एटींनाद्वारे मारकोनीपर्यंत पोहचला. आज आपण विना तारेशिवाय ज्याप्रमाणे संदेश पाठवू शकतो, याची सुरुवात मारकोनी यांच्या प्रयोगामुळेच झाली होती. यासाठी 1909 मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार देखील मिळाला.

मारकोनी यांनी ज्या सिग्नल हिल नावाच्या डोंगरावर हा प्रयोग केला होता, ती वैज्ञानिकांसाठी एक खास जागा आहे. ही जागा मारकोनी डोंगर म्हणून देखील ओळखली जाऊ लागली. येथील अ‍ॅन्टिनाद्वारेच जगाला टायटॅनिक जहाजाच्या अपघाताबद्दल व जहाज बुडाल्याबद्दल माहिती मिळाली होती.

सिग्नल हिल कॅनडामध्ये एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. सुट्टीच्या दिवशी शेकडो लोक या ठिकाणी भेट देतात. याच ठिकाणी मारकोनी यांनी इंग्लंडवरून पाठवलेले रेडिओ संदेश वाचण्यासाठी रडार लावला होता.

Leave a Comment