अमृतसर सुवर्णमंदिर लंगरविषयी खास माहिती


फोटो सौजन्य एनडीटीव्ही
शीख समुदायाचे पवित्र स्थान अमृतसर मधील सुवर्णमंदिर हे केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. या मंदिरात चालविला जाणारा लंगर हा नेहमीच चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे. या गुरुद्वारात अतिशय उत्तम प्रकारचे प्रसाद भोजन वर्षानुवर्षे त्याच शिस्तीने आणि नेटकेपणाने दिले जात आहे. शिखांचे पहिले गुरु नानकदेव यांनी या लंगरची सुरवात केली होती.

या लंगर मध्ये सर्व धर्माच्या लोकांना प्रवेश दिला जातो आणि येथे सर्वाना मोफत जेवण दिले जाते. स्वयंसेवक त्यासाठी कार्यरत असतात. दररोज किमान १ लाख लोक लंगरमध्ये जेवतात. सणउत्सव किंवा साप्ताहिक सुट्टी दिवशी ही संख्या दुप्पटीने वाढते.


या लंगरसाठी दररोज ७ हजार किलो गहू, १३०० किलो डाळ, १२०० किलो तांदूळ, ५०० किलो लोणी लागते आणि १०० सिलिंडर, ५०० किलो लाकडावर या स्वयंपाक होतो. रोज ४५० स्वयंसेवक तीन पाळ्यात भाज्या निवडणे, चिरणे, वाढणे, भांडी धुणे अशी कामे करत असतात. रोट्या भाजण्यासाठी इलेक्ट्रिक मशीन असून त्यावर तासात ३ ते ४ हजार रोटी तयार होतात. शिवाय महिला तासाला २००० रोटी बनवितात. हे सर्व जेवण शाकाहारी असते.

लंगर चालविण्यासाठी भाविकांच्या दानातून पैसा मिळतो. लंगर मध्ये वाढपाचे काम पुरुष मंडळी करतात आणि जमिनीवर बसून भाविक लंगरचा प्रसाद घेतात. खरकटी भांडी तीन वेळा वेगवेगळया ग्रुप कडून स्वच्छ केली जातात. लंगर हॉल मधील स्वच्छता अगदी पाहण्यासारखी असते.

Leave a Comment