येतेय इलेक्ट्रिक हमर


फोटो सौजन्य रश लेन
एसयूवी आणि पिकअप क्षेत्रात जनरल मोटर्सच्या हमरचे आकर्षण काही वेगळेच आहे. जगभर या रफटफ वाहनाचे प्रेमी आढळतात. भारताबद्दल बोलायचे तर आपला माही म्हणजे महेंद्रसिंग धोनी, हरभजनसिंग, गायक मिका सिंग यांची नावे सांगता येतील. मुख्यतः ऑफरोड प्रवासासाठी उत्तम असलेल्या या वाहनाचे उत्पादन १० वर्षापूर्वी उत्सर्जन मानक प्रकरणापासून जनरल मोटर्सने बंद केले होते.

हमर प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी जनरल मोटर्सनी दिली असून ते हमर नव्या अवतारात पुन्हा सादर करणार आहेत. ही हमर शून्य प्रदुषण करणारी म्हणजे इलेक्ट्रिक हमर आहे. या संबंधातला एक टीझर जनरल मोटर्सने नुकताच रिलीज केला आहे. त्यात या एसयुव्हीची काही वैशिष्टे सांगितली गेली आहेत. टीझर नुसार ही हमर पहिल्या एसयुव्ही पेक्षा चांगला परफॉर्मन्स देईल. तिला १००० हॉर्सपॉवरची शक्ती निर्माण करू शकेल अशी जबरदस्त मोटर दिली गेली आहे. ही हमर ० ते १०० किमीचा वेग अवघ्या ३ सेकंदात घेईल.

ही हमर ऑफरोड धावेलच पण अति इंधन खाणारी हा तिच्याबाबत असलेला समज दूर करेल. अमेरिकेतील लोकप्रिय सुपरबाऊल फुटबॉल सामन्यादरम्यान या हमरची ३० सेकंदाची जाहिरात केली जात असून या एसयूवी बद्दलची संपूर्ण माहिती २० मे २०२० मध्ये समजेल असे जाहीर केले गेले आहे.

Leave a Comment