पवन जल्लाद मेरठला परतला


फोटो सौजन्य पत्रिका
निर्भया रेप प्रकरणातील चौघा गुन्हेगारांना १ फेब्रुवारी रोजी देण्यात येणारी फाशी पुढे ढकलली गेल्यामुळे तिहार जेल प्रशासनाने फाशीची तयारी थांबविली आहे. फाशी देण्यासाठी तिहार जेल मध्ये हजर झालेला पवन जल्लाद आज म्हणजे शनिवारी मेरठ येथे परत जात असून फाशीचे दोर लोणी लावून चोख बंदोबस्तात सुरक्षित लॉकर मध्ये ठेवले गेले आहेत असे समजते.

जेलमधून मिळालेल्या माहितीनुसार १ फेब्रुवारीला विनय सोडून बाकी तीन जणांना फाशी देण्याची प्रक्रिया पूर्ण केली गेली होती. त्यासाठी ३१ जानेवारीला ट्रायल घेतली गेली. गुरुवारी गुन्हेगारांच्या नातेवाईकांना अंतिम भेटीसंदर्भात तुरुंगात बोलावले गेले होते. त्यानुसार अक्षय सोडून मुकेश आणि पवन यांच्या नातेवाईकांनी त्यांची भेट घेतली होती. अक्षयचे कुटुंबीय त्यांच्या भेटीसाठी आले नव्हते. फाशीची ट्रायल सुरळीत पार पडली होती. मात्र आता फाशीला तूर्त स्थगिती दिल्याने जल्लाद पवन त्याच्या गावी परतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पवन जल्लादला दरमहा पाच हजार रुपये पगार मिळतो आणि फाशी दिल्याचे वेगळे पैसे दिले जातात. या चौघांना फाशी दिल्यावर पवन ला एक लाख रुपये मिळणार होते आणि तो त्या पैशातून त्याच्या मुलीचे लग्न करणार होता.

Leave a Comment