केवळ 78 रुपयांमध्ये खरेदी करा या शहरात घर

इटलीच्या टारांटो या शहरात केवळ 78 रुपये म्हणजेच 1 यूरोमध्ये घर खरेदी करता येणार आहे. लिटिल इटली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात अशाप्रकारची पहिलीच सुरूवात आहे. लोकसंख्या वाढवण्यासाठी अशाप्रकारची योजना आणण्यात आली आहे. सुरुवातीला या योजनेद्वारे 5 घरे विकली जातील.

19 व्या दशकात इटलीचे बंदर असलेल्या या शहराची लोकसंख्या 40 हजार होती. मात्र आता ही संख्या केवळ 3 हजार झाली आहे. आता या शहराची लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रशासनाने हा मार्ग अवलंबला आहे. जवळपास 25 हजार अशा घरांची विक्री केली जाणार आहे.

या आधी वर्ष 2011 मध्ये सिसलीची राजधानी पलेर्मो येथील गांगी शहरात 78 रुपयांमध्ये घर विकण्याची योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेद्वारे जवळपास 150 घरे विकण्यात आली होती. वर्ष 2019 मध्ये देखील सिसलीच्या बीवोना, साम्बुका आणि मुसोमेलीमध्ये अशी ऑफर होती.

एका स्टील प्लांटमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे लोकांनी हे शहर सोडले होते. 2024 पर्यंत हा प्लांट पर्यावरणासाठी अनुकूल करण्याची अधिकाऱ्यांची योजना आहे.

Leave a Comment