BS-6 इंजिनसह लाँच झाली शानदार ‘टीव्हीएस अपाचे आरआर 310’

टीव्हीएसने आपली फ्लॅगशिप मोटारसायकल टीव्हीएस अपाचे आरआर 310 ला बीएस6 मॉडेलसह लाँच केले आहे. या बाईकची किंमत 2.40 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत किंमतीत 12 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

नवीन अपाचे आरआर10 मध्ये बीएस6 मानक, 310.2 सीसी इंजिन आहे, जे 9700 आरपीएम 34 एचपी पॉवर आणि 7,700 वर 27.3 एनएम टॉर्क निर्माण करते. इंजिन स्पिलर क्लचसोबत 6-स्पीड ट्रांसमिशनने सुसज्ज आहे. या बाईकची टॉप स्पीड ताशी 160 किमी असून, बाईकला ताशी 0 ते 60 किमीचा वेग पकडण्यासाठी केवळ 2.9 सेंकदाचा वेळ लागतो.

Image Credited – Navbharattimes

अपाचे आरआर 310 नवीन ड्युअल टोन रंगात येईल. जे रेड एक्सेंट्ससोबत काळ्या आणि गडद रंगात असेल. सोबतच बाईकमध्ये नवीन ग्राफिक्स देण्यात आले आहेत. बाईकचे डायमेंशन्स, ड्युअल प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेललॅम्प आणि सीट्स आधी सारखेच आहेत.

नवीन बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टेडसोबत 5 इंच कलर टीएफटी इंस्ट्रूमेंट पॅनेल देण्यात आले आहे. या स्क्रीनला स्मार्टफोनशी कनेक्ट करता येईल.

Image Credited – India Car News

नवीन इंस्ट्रूमेंट कंसोलमध्ये व्हिकल हेल्थ अलर्ट ( फ्यूल लेव्हल, सर्व्हिस ड्यूस आणि एबीएस मालफंक्शन) आणि मोबाईल फोन स्टेट्स (बॅटरी आणि नेटवर्क) देखील दिसेल. स्क्रीनमध्ये देण्यात आलेले सेंसर एम्बियंट लायटिंगनुसार दिवस आणि रात्रीचे सेटिंग्स ऑटोमेटिक एडजस्ट करते.

कंपनीने बाईकमध्ये रेन, अर्बन, स्पोर्ट आणि ट्रॅक या चार रायडिंग मोडसोबत राइड-बाय-वायर टेक्नोलॉजी दिली आहे. मोडनुसार इंजिनचे पॉवर, थ्रॉटल रेस्पॉन्स आणि एबीएस सेटिंग्स बदलते. मोडनुसार, इंस्ट्रुमेंट पॅनेलची थीम देखील बदलते. बाईकमध्ये ग्लाइड थ्रू टेक्नोलॉजी देखील मिळेल, जी पहिल्या व दुसऱ्या गेअरमध्ये काम करते. या फीचरमुळे कमी वेगात विना क्लच दाबता गाडी चालवता येते.

Leave a Comment