थर्ट पार्टी विम्याची आठवण करून देणार आरटीओ

सर्वोच्च न्यायालयाने जुलै 2018 मध्ये गाडी मालकाकडे थर्ड पार्टी विमा असणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे थर्ड पार्टी विमा सर्वांकडे असणे गरजेचे आहे. मात्र अनेकदा थर्ड पार्टी विम्याचा कालावधी संपल्याचे लक्षात राहत नाही. आता थर्ड पार्टी विम्याची अंतिम तारीख लक्षात ठेवण्याची गरज राहणार नाही. कार आता स्वतः परिवहन विभाग ज्यांच्याकडे थर्ड पार्टी विमा नाही अथवा विम्याचा कालावधी संपला आहे, अशांना मेसेज पाठवणार आहे.

राज्य परिवहन विभाग, इंश्योरेंस रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) सोबत मिळून एक पायलट प्रोजेक्ट चालवणार आहे. हा पायलट प्रोजेक्ट कर्नाटक, बिहार, ओडिसा, आंध्र प्रदेश आणि दिल्लीमध्ये चालवला जाईल.

तेलंगाना परिवहन विभागात इरडाचे चीफ जनरल मॅनेजर यग्नप्रिया भारत यांनी सांगितले की, आम्ही या प्रोजेक्टवर काम सुरु केले आहे. योजनेनुसार, गाडी मालकाला मेसेज पाठवले जात आहेत. इंश्योरेंस इंफॉर्मेशन ब्यूरोकडे विमाधारक वाहनांची पुर्ण यादी आहे. केंद्र सरकारच्या वाहन डेटाबेसमध्ये सर्व रजिस्टर्ड वाहनांची माहिती आहे. त्यामुळे कोणत्या वाहनांचा विमा नाही, हे विभागाला समजण्यास मदत होते.

परिवहन विभाग रजिस्ट्रेशन नंबरशी जोडलेल्या सर्व क्रमांकाना मेसेज पाठवणार आहे. जर एखाद्याने गाडी विकली असेल अथवा नंबर अपडेट केला नसेल तर जुन्या मालकाला मेसेज जातील. विभागाने सांगितले आहे की, जर असे झाले तर त्वरित तक्रार करावी. अन्यथा चलान आणि अन्य कागदपत्रे जुन्या पत्त्यावर जातील.

Leave a Comment