तापसीच्या ‘थप्पड’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

अभिनेत्री तापसी पन्नूची प्रमूख भूमिका असलेला आगामी चित्रपट ‘थप्पड’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाद्वारे तापसीचा एक वेगळा लूक चाहत्यांना पहायला मिळाली.

पतीने एकदा कानाखाली मारल्याने प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहचते व यामुळे नवरा-बायकोचे आयुष्य कशाप्रकारे बदलते हे ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे.  एकदा थोबाडीत मारणे ही काही छोटी बाब नाही, असा संदेश ट्रेलरमधून देण्यात येत आहे. कौटुंबिक हिंसाचारावर हा चित्रपट आधारित आहे.

तापसी व्यतिरिक्त चित्रपटात रत्ना पाठक, मानव कौल, दीया मिर्झा आणि राम कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुल्क आणि आर्टिकल 15 सारखे चित्रपट बनवणारे अनुभव सिन्हा यांनी केले आहे. तर भूषण कूमार यांनी हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे. येत्या 28 फेब्रुवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment