1.96 कोटींची लग्झरी कार ‘लेक्सस एलसी500एच’ भारतात दाखल

लग्झरी वाहन कंपनी लेक्ससने आपली शानदार ग्रँड टूरर ‘एलसी500एच’ भारतात लाँच केली आहे. या लग्झरी कारची किंमत 1.96 कोटी रुपये आहे. ही कार आतापर्यंत 68 देशांमध्ये उपलब्ध होती. या कारची विक्री होणारा भारत 69 वा देश ठरला आहे. जगभरात आतापर्यंत 12 हजार एलसी500एच ची विक्री झाली आहे.

या लग्झरी कारमध्ये हायब्रिड पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे. यामध्ये 3.6 लीटर, व्ही6 पेट्रोल इंजिन मिळेल. जे 180 एचपी पॉवर निर्माण करते. याच्या हायब्रिड इंजिनचे कम्बाइंड पॉवर आउटपूट 345एचपी आहे. कंपनीचा दावा आहे की, केवळ 4.7 सेंकदात कार ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडते.

Image Credited – Navbharattimes

लेक्सस एलसी500एच चा लूक शानदार आहे. कारच्या समोरील बाजूस मोठे ग्रिल, एल-शेप डेटाइम रनिंग लाइट्स आणि एलईडी हेडलॅम्पस देण्यात आलेले आहेत. कारमध्ये 10.3 इंच इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल आणि अडजेस्टेबल ड्राइव्ह सीट सारखे फीचर्स देखील मिळतील. कारमध्ये ग्राहक आपल्या आवडीनुसार बदल करू शकतात. मात्र यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.

Image Credited – Navbharattimes

या लग्झरी कारची डिलिव्हरी मार्चपासून सुरु होईल. भारतात ही लग्जरी कार जॅग्वार एफ-टाइम व्ह8, बेंटली कॉन्टिनेंटल आणि मर्सिडिज एएमजी जीटी या गाड्यांना टक्कर देईल.

Leave a Comment