केटीएमने BS-6 इंजिनसह लाँच केल्या अनेक बाईक्स

स्पोर्ट्स बाईक कंपनी केटीएमने भारतीय बाजारात बीएस6 मानक इंजिन असणाऱ्या आपल्या बाईक सादर केल्या आहेत. या बाईक्सची किंमत 1.38 लाख रुपये ते 2.53 लाख रुपये आहे.

Image Credited – NDTV

केटीएमने बीएस6 मानक इंजिनसह 200 ड्यूक, आरसी 200, 390 ड्यूक, आरसी 390, 125 ड्यूक आणि आरसी 125 बाईक लाँच केल्या आहेत.  जुन्या मॉडेलच्या तुलनेत बीएस6 इंजिनच्या मॉडेल्समध्ये 3,328 ते 10,496 रुपयांनी वाढ झाली आहे.

Image Credited – Overdrive

बीएस6 इंजिनच्या नवीन 200 ड्यूकची किंमत 1,72,279 रुपये, आरसी 200 – 1,96,768 रुपये, 390 ड्यूक – 2,52,928 रुपये, आरसी 390 2,48,075 रुपये, 125 ड्यूक – 1,38,041 रुपये आणि आरसी 125 बाईकची किंमत 1,55,277 रुपये आहे.

बीएस6 इंजिन असणाऱ्या 125 ड्यूक आणि आरसी 125 ची विक्री फेब्रुवारी अखेरपर्यंत विक्री सुरु होईल. तर केटीएमच्या अन्य मॉडेल्सची विक्री सुरु झाली आहे.

Leave a Comment