या आहेत इंस्टाग्रामवरील सर्वात स्टायलिश आजीबाई

एक 92 वर्षीय आजीबाई सध्या आपले हटके स्टाइलमुळे चर्चेत आहेत. त्यांचा अंदाज तरुणांना देखील हैराण करत आहे. या आजीबाईंचे नाव हेलेन रुथ एलम आहे. इंस्टाग्रामवर या आजीबाईंना मोठमोठे दिग्गज फॉलो करतात. त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटचे नाव baddiewinkle असून, त्यांचे 30 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

हेलेन या इंटरनेट पर्सनेलिटी असून, त्यांना Baddie Winkle नावाने ओळखले जाते. आजी 82 वर्षांच्या असताना इंटरनेट सेसेंशन झाल्या. हे सर्व त्यांच्या नातीमूळे घडले.

View this post on Instagram

LA Vibez

A post shared by BAD LIL BADDIE 👵🏼🦋🐰🌈💖🍑 (@baddiewinkle) on

त्या अमेरिकेतील वाको येथील आपल्या फॉर्म हाउसमध्ये आपले आयुष्य जगत होत्या. आपल्या नातू-नातीसोबत वेळ घालवायच्या एकेदिवशी नातीने आजीचा एक भन्नाट ड्रेसमध्ये फोटो काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला. तेव्हापासून आजी इंटरनेटवर स्टार झाल्या.

आजींनी 2014 साली इंस्टाग्रामवर पहिला फोटो शेअर केला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी 300 पेक्षा अधिक पोस्ट केल्या आहेत.

Leave a Comment