फॉसिलचे स्टायलिश ‘हायब्रिड एचआर’ स्मार्टवॉच भारतात लाँच

फॉसिलने आपली हायब्रिड एचआर प्रिमियम स्मार्टवॉचला भारतात लाँच केले आहे. ग्राहकांना या सीरिजमध्ये दमदार बॅटरी, डिस्प्ले आणि हार्ट रेट मॉनिटर करणारे सेंसर्स सारखे फीचर्स मिळतील. हे स्मार्टवॉच आयओएस आणि अँड्राईड प्लॅटफॉर्मवर देखील काम करते. अमेझॉनवरून हे वॉच खरेदी करता येईल.

कंपनीने हायब्रिड एचआर या स्मार्टवॉचला दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. ज्यात एक लेदर आणि दुसरे स्टेनलेस स्टील आहे. पहिल्या व्हेरिएंटची किंमत 14,995 रुपये आणि दुसऱ्याची किंमत 16,495 रुपये आहे.

Image Credited – techgenyz

या स्मार्टवॉचमध्ये कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा मिळेल. यामध्ये हार्ट रेट, ट्रॅकिंग, वर्क आउट मॉनिटर आणि रिअल टाइम वेदर सारखे फीचर्स मिळतील. सोबतच युजर्सला कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ सपोर्ट मिळेल. कंपनीचा दावा आहे की बॅटरी सिंगल चार्जमध्ये दोन आठवडे टिकेल.

Image Credited – Digital Terminal

कंपनीने या स्मार्टवॉचमध्ये तीन बटन दिले आहेत. ज्याद्वारे सहज कॉल उचलण्यास मदत होते. यासोबतच यात कस्टमाइज फेस डायल आणि फिल्टर इनकमिंग स्मार्टफोन नॉटिफिकेशनची सुविधा देखील मिळेल. या स्मार्टवॉचमध्ये रॅपिड चार्जिंग फीचर मिळेल. ज्याद्वारे केवळ 50 मिनिटात बॅटरी फूलचार्ज होईल.

Leave a Comment