अनोखी पेटिंग बनवून कोबी ब्रायंटला श्रद्धांजली

अमेरिकेतील एका जोडप्याने दिग्गज बास्केटबॉलपटू दिवंगत कोबी ब्रायंटला मैदानावर 115 फूट लांब आणि 92 फूट रुंद पेटिंग बनवून श्रद्धांजली दिली आहे. यासाठी त्यांनी लॉन मोव्हर (मशीन) आणि जीपीएसचा वापर केला. ही पेटिंग गवतावर बनविण्यात आली असल्याने दोन दिवसांनी अदृश्य होईल.

प्लिसेंटन येथे राहणारे जोडपे पेट डेव्हिस आणि त्यांची पत्नी पियर्सनने गवताला पेटिंगच्या अनुरूप कापण्यासाटी ग्रास मोव्हरचा वापर केला. कॅलिफोर्नियाच्या अल्मेंडा कंट्री येथील प्लीसेंटन पार्कमध्ये ही पेटिंग बनविण्यात आली आहे.

पेटिंगला तीन वेगवेगळ्या भागात तयार करण्यात आले आहे. आधी चेहऱ्याचा गोल आकार, त्यानंतर मान व नंतर संपुर्ण शरीर यानुसार गवत कापण्यात आले. पियर्सन यांनी सांगितले की, यासाठी जीपीएसचा वापर करत डिजिटल प्रक्रिया करण्यात आली.

या जोडप्याने सांगितले की, आम्ही कोबीचे माठे चाहते आहोत. तो व्यक्ती म्हणून जेवढा चांगला माणूस होता, तेव्हाच उत्तम खेळाडू होता. आमच्याकडे नशीबाने ही टेक्नोलॉजी होती, ज्याद्वारे आम्ही त्याला श्रद्धांजली देऊ शकलो.

काही दिवसांपुर्वीच 41 वर्षीय दिग्गज बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट आणि त्याच्या 13 वर्षीय मुलीचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे.

Leave a Comment