बिल गेट्स कन्या जेनिफरला मिळाला जीवनसाथी


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
प्रेम करणे आणि प्रेम सफल होणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. सगळ्यांचेच प्रेम पूर्णत्वास जाते असे नाही. प्रेमात सफल झालेले जे थोडे भाग्यवान असतील त्यात आता जगातील श्रीमंत यादीत दोन नंबरवर असलेले मायक्रोसोफ्टचे बिल गेट्स यांच्या जेष्ठ कन्येचा समावेश झाला आहे. जेनिफर गेट्स हिला तिचा जीवनसाथी मिळाला असून तिचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला. या अब्जाधीश कन्येचा जोडीदारही अब्जाधीश असून त्याचे नाव आहे नायल नस्सार. गेली चार वर्षे ते दोघे रिलेशनशिप मध्ये होते.

जेनिफरने बुधवारी इन्स्टाग्रामवर नायल सोबतचे तिचे फोटो पोस्ट केले असून नायल तिच्यासाठी एकमेव आदर्श पुरुष असल्याचे म्हटले आहे. गेल्या आठवड्यातील सुंदर स्थळी त्याच्यासोबत घालविलेल्या क्षणांच्या आठवणी जाग्या झाल्याचे आणि उर्वरित आयुष्य असेच शिकणे, हसणे आणि प्रेम करण्यात घालवावे अशी इच्छा व्यक्त करते. यासाठी आता अधिक प्रतीक्षा करणे शक्य नाही असेही जेनिफर लिहिते.

नस्सार यानेही त्याच्या इन्स्टाग्रामवर जेनिफरचा होकार मिळाल्यामुळे जगातील सुदैवी माणूस असल्याची भावना व्यक्त केली आहे. नस्सार मूळचा इजिप्तचा असून त्याचे बालपण कुवेत येथे गेले आहे. त्याला घोडेस्वारीची भयंकर आवड असून त्याने जगभरातील अनेक स्पर्धात भाग घेतला आहे. त्याचे कुटुंब २००९ मध्ये कॅलिफोर्निया मध्ये स्थायिक झाले आहे. जेनिफर आणि त्याची ओळख घोडेस्वारीच्या आवडीतूनच झाली होती आणि आता ही मैत्री नात्यात बदलत आहे.

Leave a Comment