न्यूझीलंडचा टंगाळा गोलंदाज कायले टीम इंडियासाठी धोकादायक?


फोटो सौजन्य, जागरण
५ फेब्रुवारी पासून हेमिल्टन येथे खेळल्या जाणाऱ्या तीन वनडे सामन्याच्या मालिकेत न्यूझीलंडने त्यांचे नवे अस्त्र सामील केले आहे. या मालिकेसाठी स्थानिक पातळीवरील क्रिकेटमध्ये अतिशय चमकदार कामगिरी करणाऱ्या कायले जमियान या वेगवान गोलंदाजाचा समावेश केला गेला आहे. हे कायले अस्त्र टीम इंडियासाठी चांगलीच डोकेदुखी निर्माण करेल असा अंदाज व्यक्त होत आहे.

न्यूझीलंड मध्ये टी २० ची पाच सामन्यांची मालिका खेळत असलेल्या टीम इंडियाने तीन सामने जिंकून आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दोन सामने अजून बाकी असून त्यानंतर तीन वनडे सामन्याची मालिका खेळली जाणार आहे. ५ फेब्रुवारीपासून हेमिल्टन मध्ये खेळल्या जाणाऱ्या या मालिकेत टीम इंडियाच्या विरुध्द खेळण्यासाठी निवडल्या गेलेल्या कायलेची उंची ६ फुट ८ इंच असून तो न्यूझीलंड टीम मधील आत्तापर्यंतच्या खेळाडूंत सर्वात उंच खेळाडू आहे. उजव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या कायलेची स्विंग आणि सीमवर जबरदस्त पकड आहे आणि हेच टीम इंडियासाठी धोक्याचे ठरू शकते.

२५ वर्षीय कायले याने अजून एकाही आंतरराष्टीय एक दिवसीय सामना खेळलेला नाही. मात्र त्याने २५ फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यात ७२ विकेट काढल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी १६० रन्स मध्ये ११ विकेट्स अशी आहे. इंडिया ए टीमविरुद्ध त्याने सहा विकेट काढल्या आहेत.

Leave a Comment