तिहार जेलमध्ये पोहोचला पवन जल्लाद


फोटो सौजन्य अमरउजाला
निर्भया रेप प्रकरणातील चार आरोपीच्या फाशीबाबतचे कायदेशीर डावपेच अजून सुरु असतानाचा तिहार जेल प्रशासनाने गुन्हेगारांना फाशी देण्याच्या तयारीला अंतिम रूप दिले आहे. गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास पवन जल्लाद तिहार तुरुंगात पोहोचला असून त्याची ओळख गुप्त ठेवल्याचे समजते. पवनला नक्की कुठे ठेवले आहे याची माहिती गुप्त ठेवली गेली आहे. मात्र गुरुवारी त्याने जेल अधिकारी आणि संबंधित लोकांसोबत फाशी घराची पाहणी केल्याचे सांगितले जात आहे.

गुरुवारी ही पाहणी सायंकाळी केली गेल्याने फाशीची ट्रायल घेता आली नव्हती ती आज म्हणजे शुक्रवारी घेतली जाणार आहे. ही ट्रायल पूर्ण दिवस चालणार असून यावेळी तुरुंग अधिकारी, लोकनिर्माण विभाग, तिहार मध्यवर्ती हॉस्पिटल मधील डॉक्टर उपस्थित असतील. गुन्हेगारांच्या आरोग्य अहवालानुसार फाशीच्या फांद्याचा आकार ठरवून आरोपींच्या वजनाच्या दीडपट वजनाचे पुतळे लटकविण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यात काही गडबड झाली तर लगेच दुरुस्ती केली जाईल असे समजते.

तिहारच्या तीन नंबरच्या जेलमध्ये त्यासाठी तयारी सुरु आहे. पवन जेथे राहिला आहे त्याच्या आसपासच्या बराकी बंद केल्या गेल्या असून जेलचे दरवाजे परवानगी शिवाय उघडण्यास बंदी केली गेली आहे. निर्भया केस मधील आरोपी त्यांच्या नातेवाईकांना शुक्रवारी भेटू शकणार असून ही कदाचित त्यांची शेवटची भेट असेल. डेथ वॉरंट नुसार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वा. या आरोपींना फाशी दिले जाणार आहे.

Leave a Comment