कोरोना लस विकासासाठी जॅक मा यांचे १.४४ कोटी डॉलर्स दान


फोटो सौजन्य देशबंधू
चीन मधून वेगाने जगभर फैलाव होत असलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूने आत्तापर्यंत १५० हून अधिक जणांचे बळी घेतले आहेत. या विषाणूविरोधी लस तयार करणे आणि या विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी काम करण्यासाठी ईकॉमर्स कंपनी अलीबाबाचे संस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्ती जॅक मा यांनी १.४४ कोटी डॉलर्स दान केले आहेत. जॅक मा फाउंडेशनने या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

या पोस्टनुसार दोन चीनी सरकारी अनुसंधान संस्थांना ५८ लाख डॉलर्स दिले गेले असून बाकी रक्कम या विषाणूचा फैलाव रोखणे आणि त्यावर नियंत्रण आणणे, उपचार आणि औषध पुरवठा त्यासाठी दिले गेले आहेत. वैज्ञानिक संघटनांना लस निर्मितीसाठी एआय कॉम्पुटर सेवा कंपनी मोफत पुरविणार आहे.

चायना डेलीच्या बातमीनुसार कोरोना विषाणू उपचारासाठी पैसे पुरविण्यात अलीबाबा प्रमुख कंपनी आहे. याशिवाय स्मार्टफोन निर्माते हुवावे, ईकॉमर्स टेनसेट, सर्च इंजिन बेद्डू, टिकटॉक मालक बाईटडांस, फूड डिलीव्हरी फर्म मॅटूअल डीमनपिंग यांनीही मदतीचा हात दिला आहे. अमेरिकेतील संशोधक कोरोना विषाणूची लस बनविण्याचे प्रयत्न करत असून ही लस वापरात आणायला आणखी सहा महिने लागतील असे सांगितले जात आहे.

Leave a Comment