अमेरिका मेक्सिको सीमेवर सापडले सर्वात मोठे तस्करी भुयार


फोटो सौजन्य दै, भास्कर
अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर आत्तापर्यंत सापडलेल्या असंख्य तस्करी भुयारातील सर्वाधिक लांबीचे भुयार समोर आले असून या भूयाराची लांबी ४३०९ फुट आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या भुयारात लिफ्ट, रेल्वे ट्रॅक, ड्रेनेज सिस्टीम, एअर व्हेंटिलेटर, हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक केबल्स आहेत. या भुयारामुळे मेक्सिकोतील तीजुआना औद्योगिक केंद्र कॅलिफोर्नियातील सॅन डीअॅगोशी जोडले गेले आहे.

या भुयाराचा शोध लागला असला तरी येथे ड्रग्स सापडली नाहीत तसेच अजून कुणालाही अटक झालेली नाही असे सांगितले जात आहे. हे भुयार कुणी आणि कधी बनविले याचाही काही अंदाज अद्याप आलेला नाही. भुयाराच्या तोंडाचा शोध मेक्सिकोमधील तस्करी विभागातील अधिकाऱ्यांनी ऑगस्ट मधेच लावला होता आणि ही माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी तपास करून या भुयाराचा नकाशा तयार केला आणि बुधवारी भुयार सापडल्याची माहिती उघड केली.

युएस कस्टम बॉर्डर अधिकारी म्हणाले जमिनीखाली ७० फुट हे भुयार आहे. त्याची उंची ५.५ फुट तर रुंदी २ फुट आहे. २०१६ मध्ये कॅलिफोर्नियाला लागून असलेल्या मेक्सिको सीमेवर अशी अनेक भुयारे आढळली होती त्यातील सर्वात मोठे भुयार २९६६ फुट लांबीचे होते.

Leave a Comment