फेक न्यूज रोखण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप आणू शकते खास बटन

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने भारतात फेक न्यूज रोखण्यासाठी अनेक पाऊले उचलली, मात्र तरी देखील फेक न्यूजवर लगाम घालण्यास व्हॉट्सअ‍ॅपला हवे तेवढे यश आलेले नाही. युजर्स स्वतः फेक न्यूज पासून सुरक्षित राहू शकतात. एका अभ्यासानुसार, अन्य पद्धतीद्वारे देखील फेक न्यूज रोखता येतील.

यूनिवर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया, लीडन यूनिवर्सिटी आणि आयई यूनिवर्सिटीने केलेल्या अभ्यासानुसार, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये काही इतर बटनांचा पर्याय उपलब्ध केले गेले पाहिजेत. जे रिपोर्ट, इनव्हेस्टिगेट (रेड फ्लॅग) पासून वेगळे असतील. यामध्ये Doubt बटन देखील दिले जाऊ शकते. या बटनाद्वारे युजर्सला कोणत्याही बातमीबद्दल इतर युजर्सची वेगवेगळी प्रतिक्रिया समजेल.

भारतातील फेक न्यूज रोखणे व्हॉट्सअ‍ॅपसमोर मोठे आव्हान आहे. कारण कंपनी एन्ड टू एन्ड एनक्रिप्शनमुळे चॅट पाहू शकत नाही.

यूनिवर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाच्या लेखिका समित्रा ब्रदीनाथन म्हणाल्या की, त्यांच्या निष्कर्षाद्वारे समजते की जर युजर्स स्वतः फेक न्यूजच्या बाबतीत काही पाऊले उचलत असेल, तर ही पद्धत फायदेशीर ठरते.

व्हॉट्सअ‍ॅपने फेक न्यूजवर अंकुश घालण्यासाठी मेसेज 5 पेक्षा अधिक वेळा फॉरवर्ड न करणे, फेक न्यूजबद्दल कॅम्पेन अशा अनेक गोष्टी आतापर्यंत केल्या आहेत.

Leave a Comment