उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जाऊन बाबरी मशीद बांधणार – फरहान आझमी


मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे पुत्र फरहान आझमी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फरहान यांचे म्हणणे आहे की, 100 दिवस पुर्ण झाल्यावर मुख्यमंत्री अयोध्येत जाण्याच्या निर्णयावर मुस्लिमांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घाबरत असल्याचे फरहान आझमी म्हणाले आहेत. फरहान आझमी म्हणाले की, उद्धव ठाकरे जर अयोध्यामध्ये राम मंदिर बांधणार असतील तर अयोध्याला आम्हीसुद्धा जाणार पण तिथे आम्ही बाबरी मशीद बांधणार असल्याचे म्हटल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात 27 जानेवारी रोजी मुंबईत झालेल्या मोर्चाला संबोधित करताना फरहान आझमी म्हणाले की, अयोध्येत जर उद्धव ठाकरे जात असतील तर मीसुद्धा जाईल. आम्ही सर्व जाऊ. महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही मी आमंत्रित करेन. माझे वडीलही जातील. राम मंदिर बांधण्यासाठी उद्धव ठाकरे जातील, पण आम्ही बाबरी मशीद बांधायला जाऊ. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे निराश झालो आहोत.

फरहान आझमी पुढे म्हणाले की, 100 दिवस महाविकास आघाडी सरकारला पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्याला जाण्याचा निर्णय मुस्लिमांना घाबरवण्यासाठी घेतला आहे. पण त्यांना मी सांगू इच्छितो की, जगाची 2.5 अरब लोकसंख्या आहे. त्यामध्ये 50 पेक्षा जास्त मुस्लिम देश आहेत, जे आम्हाला हसत-खेळत आमच्या देशाला आम्हाला परत घेऊन जातील. पण आम्ही जाणार नाही.

फरहान आझमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवत म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या नावावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मते मिळाली. आता त्यांना सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मी सांगतो की त्यांचे सरकार 6 ते 8 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही. आतापासूनच त्यांनी नोटाला मत देण्यास सांगितले. संपूर्ण शिवसेनेमध्ये जर कोणी लायक असेल तर ते फक्त उद्धव ठाकरे असल्याचे खळबळजनक वक्तव्य फरहान आझमी यांनी केले आहे.

महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत फरहान आझमी यांच्या वक्तव्याला उत्तर देताना म्हणाले की, त्यांनी दिलेले विधान म्हणजे त्यांचे वैयक्तिक मते असून निवडणुकीपूर्वी अयोध्येत जाण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता आणि म्हणूनच ते अयोध्येत जात आहेत.

Leave a Comment