तुकाराम मुंढे पुन्हा ‘अॅक्शन मोड’मध्ये चार कर्मचाऱ्यांना दिला दणका!


नागपूर : नागपूर महानगरपालिकाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे पुन्हा आपल्या अॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी नागपूर पालिका आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर, त्यांनी दुसऱ्याच दिवशी चार कर्मचाऱ्यांना दणका दिला. तुकाराम मुंढे यांनी कामात अनियमितता आढळल्याने लेखा आणि वित्त विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीआहे. कार्यभार स्विकारताच तुकाराम मुंढे यांनी दुसऱ्याच दिवशी लेखा आणि वित्त विभागाची पाहणी केली.

आयएएस तुकाराम मुंढे यांच्या नावाचाच एवढा दरारा आहे, की त्यांच्या बदलीची ऑर्डर निघाली आणि ते रुजू होण्यापूर्वीच नागपूर मनपाचे कर्मचारी आणि अधिकारी वेळेत कार्यालयात यायला लागले. ते मंगळवारपासून रुजू झाल्यानंतर तर अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना धडकीच भरली. त्यांनी पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांची शाळा घेतली आणि काम न करणाऱ्यांना घरी जावे लागेल, असा इशारा दिला. तर दुसऱ्या दिवशी सहा बैठका घेत विकासकामांचा आढावा घेतला, जनता दरबारही सुरु केला.

Leave a Comment