केरळमध्ये आढळला कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण


केरळ – कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण केरळमध्ये प्राणघातक आढळला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. चीनमधील हुआन विद्यापीठात हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. चीनवरुन तो भारतात आला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून उपचार सुरु आहे. त्याच्यावर केरळमध्ये उपचारासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.

आतापर्यंत १७० नागरिकांचा चीनमध्ये झपाट्याने पसरणाऱ्या जीवघेणा कोरना व्हायरसने बळी घेतला आहे. तर ७००० पेक्षा जास्त नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान, या विषाणूने आता भारतात शिरकाव केला आहे. कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण भारतातील केरळमध्ये आढळला आहे. चीनमधून भारतात आलेल्या सर्वांची तपासणी केली जात आहे. देशातील अनेक राज्यामध्ये कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णांना डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले आहेत. एकट्या केरळमध्ये ८०६ जणांना डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment