चिक्की सारखा दिसतो सुर्याचा पृष्ठभाग, पहिल्यांदा समोर आला फोटो

सुर्याच्या पृष्ठभागाचा फोटो समोर आला असून, या फोटोमध्ये सुर्याचा पृष्ठभाग एखाद्या सोन्यासारखा चमकणारा आणि शेंगदाण्याच्या चिक्की प्रमाणे दिसत आहे.

हे फोटो हवाई बेटावरील डेनियलच्या इनोये सोलर टेलिस्कोपद्वारे काढण्यात आले आहेत. हा जगातील सर्वात मोठा टेलिस्कोप आहे. सुर्याच्या तेज प्रकाशामुळे पृष्ठभाग पाहणे शक्य नसल्याचे म्हटले जात असे. मात्र टेलिस्कोपने पहिल्यांदा सुर्याच्या पृष्ठभागापर्यंत पोहचण्याची कामगिरी केली.

रिपोर्टनुसार, सुर्याचा पृष्ठभाग एखाद्या मधमाशांच्या पोळ्या सारखा असून, त्यासारख्या सेल (पेशी) सुर्याच्या संपुर्ण पृष्ठभागावर दिसून येतात. जेव्हा या सेल संकुचित आणि विस्तारित होतात, त्याचवेळी त्यांच्या मध्यभागातून तीव्र उष्णता बाहेर येते.

चित्रामध्ये पाहताना या सेल अगदी लहान वाटत असल्या तरी प्रत्येक सेल या शेकडो किलोमीटरच्या आहेत. एका सेलचे क्षेत्रफळ पृथ्वीवरील एक मोठ्या देशापेक्षा अधिक आहे.

टेलिस्कोपद्वारे 10 मिनिटांचा व्हिडीओ काढण्यात आला. यावरून स्पष्ट होते की प्रत्येक 14 सेंकदाने पृथ्वीच्या पृष्ठभागावर टर्बुलंस म्हणजेच उलथा पालथ होते. हा व्हिडीओ जवळपास 200 मिलियन वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ कव्हर करतो.

वैज्ञानिकांना आशा आहे की, टेलिस्कोपद्वारे जमा करण्यात आलेल्या डेटाद्वारे सुर्याच्या बाहेरील वायूमंडळातील चुंबकीय क्षेत्र मापण्यास मदत होईल.

Leave a Comment