काही ‘ जगावेगळ्या ‘ महिला


काही व्यक्ती इतरांपेक्षा वेगळे दिसण्याच्या अट्टाहासापायी काहीसुद्धा करण्यास तयार असतात. या अट्टाहासापायी लोक आपला पूर्ण लूक बदलून टाकायलाही मागेपुढे पहात नाही. बॉलीवूड मधील अनेक सिनेतारिका याचे उदाहरण आहेत. आपल्याला अश्या अनेक अभिनेत्री माहित आहेत, ज्यांनी कॉस्मेटिक सर्जरीच्या मदतीने आपला संपूर्ण लूकच बदलून टाकला आहे. पण हे सगळे प्रयत्न सुंदर दिसण्यासाठी असतात. पण या जगामध्ये काही महिला अश्या ही आहेत, ज्या इतर महिलांच्या मानाने फारच ‘ हटके ‘ दिसतात. काही महिलांना त्यांचे हे हटके लुक्स निसर्गानेच दिले आहेत, तर काहींनी प्रयत्नपूर्वक आपले लुक्स ‘ हटके ‘ बनविले आहेत.

कोनिता वूरस्ट या महिलेला ‘ दाढी वाली महिला ‘ म्हणूनही ओळखले जाते. कोनिता वूरस्ट खरेतर एक पुरुष आहे. याचे नाव टॉम नेविर्थ आहे. १९८८ साली टॉमचा जन्म झाला होता. पण लहानपणा पासूनच त्याचे हावभाव, उठण्या बसण्याची बोलण्याची पद्धत एखाद्या मुलीसारखी होती. काही काळानंतर टॉमचा पेहराव ही मुलीसारखाच करु लागला. जगातील सर्वात मोठी संगीत प्रतियोगिता ‘ युरोव्हिजन ‘ या स्पर्धेमध्ये टॉम पोहोचला, तो मुलीच्या पोशाखातच. त्याचे हावभाव, शरीराची ठेवण पाहून एखादी मुलगीच समोर आहे असे पाहणाऱ्याला वाटले ही असते, पण विचित्र गोष्ट ही होती, की टॉमने चेहऱ्यावर भरघोस दाढी ठेवली होती. टॉमच्या अतिशय प्रभावी गायकीने लोकांची मने जिंकली, आणि २०१४ सालचा ‘ युरोव्हीजन ‘ चा खिताब टॉमला मिळाला. लहानपणापासून त्याच्या दिसण्यावरून, त्याच्या सवयींवरून नेहमीच लोकांची नाराजी ओढवून घेत असलेल्या टॉमला पहिल्यांदाच लोकांचे कौतुक ऐकायला मिळाले. त्यानंतर टॉमने कोनिता हे नाव स्वीकारले. आता तो याच नावाने प्रसिद्ध आहे.

नागपूरची रहिवासी असलेल्या ज्योती आमगेची जगामध्ये सर्वात कमी असणारी उंची, हीच ओळख बनून राहिली आहे. ज्योतीची उंची केवळ ६१.७५ सेंटीमीटर, म्हणजेच २४.७ इंच इतकी आहे. आपल्या या आगळ्यावेगळ्या रूपाने ज्योतीला हॉलीवूडमध्ये प्रसिद्धी मिळविण्याची इच्छा आहे. ‘लेग जिंडो ‘ नामक हॉलीवूड चित्रपटामध्ये ज्योतीने भूमिका देखील केली आहे. याशिवाय टीव्ही मालिका ‘ द अमेरिकन हॉरर स्टोरी ‘ मध्येही ज्योतीने भूमिका केली आहे. २००९ सालापासून ज्योतीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये, जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून नोंदलेले आहे.

आपल्या शरीराच्या एकंदर ठेवणीच्या मानाने आपली उंची, हातापायांची लांबी इत्यादी वाढत असतात. पण मँडी सेलर्स नामक महिलेची वयात आल्यानंतर उंची वाढायची थांबली, पण पायांचे आकारमान मात्र वाढतच राहिले. अधिक तपासणी करविल्यानंतर मँडीला ‘PIK3CA जीन म्युटेशन’ नामक व्याधी असल्याचे निदान झाले. या व्याधीमुळे तिच्या पायांचे आकारमान वाढतच राहिले. मँडीचे वजन सध्या १३३ किलो आहे. त्यापैकी ९५ किलो वजन तर केवळ तिच्या पायांचे आहे. या अवाढव्य पायांमुळे मँडी चर्चेचा विषय बनून राहिली आहे.

मारिया क्रिस्टीना या महिलेचा चेहरा पाहून कोणालाही क्षणभर भीतीच वाटेल. कारण या महिलेच्या संपूर्ण चेहऱ्यावर पियर्सिंग आहेत, आणि अनेक लहान मोठे रंगेबिरंगी टॅटू आहेत. ३६ वर्षीय मारिया मेक्सिकोची राहणारी आहे. तिच्या शरीरभर असणाऱ्या टॅटूमुळे तिला ‘ लेडी ड्रॅगन ‘ या नावाने देखील ओळखले जाते. मारिया तिच्या घरामध्ये अनेक अत्याचारांना तोंड द्यावे लागले होते. त्यातून सुटका तिने आपल्या शरीरभर टॅटू गोंदवून घेतले. मारिया व्यवसायाने वकील असून, पीडित महिलांना न्याय मिळविण्याच्या कामी मारिया नेहमी व्यस्त असते.

लिझी वेलास्क्वेज सतरा वर्षांची असताना तिला ‘ जगातील सर्वात कुरूप महिला ‘ असा खिताब दिला गेला होता. त्याबद्दल लिझीने स्वतःची मते मांडणारा एक व्हिडियो बनवून यु ट्यूबवर अपलोड केला. ह्या व्हिडियोला भरपूर प्रसिद्धी मिळाली. लिझी प्रोझीटॉइड सिंड्रोम नामक आजार असून, या आजारामध्ये शरीराची वाढ पूर्णपणे होत नाही. लिझीचा जन्म झाला तेव्हा तिचे वजन एक किलोपेक्षाही कमी होते. आताही लीझीचे वजन अतिशय कमी आहे.

Leave a Comment