मुले वकील झाल्यानंतर महिलेने घेतले कायद्याचे शिक्षण, मिळवले 4 सुवर्ण पदक

शिक्षण आणि स्वप्न पुर्ण करण्यासाठी वयाचे बंधन नसते, असे म्हटले जाते. हेच 55 वर्षीय नीति रावल यांनी खरे करून दाखवले आहे. 30 वर्षीय गृहिणी राहिलेल्या नीति रावल आता वकील झाल्या आहेत. त्या एका वकिलांच्या कुटुंबातून येतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून, ते दोघेही वकील आहेत. मुलीचे लग्न झाले असून, मुलगा मुंबईत एक लॉ फर्ममध्ये नोकरी करतो.

नीति यांनी सांगितले की, मुलगा मुंबईला गेला व मुलीचे लग्न झाल्याने घरात एकटेपणा वाटत असे. त्यामुळे मला काहीतरी करायचे होते.

या विचाराने त्यांनी आपल्या कुटुंबाला साजेसा पेशा निवडला. शिक्षण सोडल्यानंतर त्यांनी 30 वर्षांनी पुन्हा गुजरात युनिवर्सिटीमध्ये अडमिशन घेतले. आता त्या पदवीधर झाल्या असून, त्यांनी दीक्षांत समारोहात 4 गोल्ड मेडल मिळवले आहेत.

नीति रावल यांचे पती मॉलिन रावल आपल्या पत्नीच्या कामगिरीवर खूप खूष आहेत. ते म्हणाले की, मला माझ्या पत्नीचा गर्व आहे. तिने 30 वर्ष गृहिणी राहिल्यानंतर शिक्षण पुर्ण केले.

आता नीति लॉ मध्ये मास्टर डिग्री घेणार आहेत. यासाठी त्यांनी फॉर्म देखील भरला आहे.

Leave a Comment