गुगलकडे या ज्येष्ठ अभिनेत्रीने केला अजब आग्रह


बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी आपआपल्या परीने सोशल मीडियाचा वापर करत असतात. कोणी, फक्त फोटो पोस्ट करण्यासाठी, तसेच मित्रमंडळी किंवा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तर कोणी या माध्यमाचा इतर काही कारणांसाठी वापर करत असतात.अभिनेत्री नीना गुप्ता हे वयाची कोणतीही अट नसणाऱ्या या माध्यमावर आपल्या प्रत्येक पोस्टने लक्ष वेधणारे एक नाव आहे.

आपल्या जीवनशैलीसाठीही ‘बधाई हो’, ‘पंगा’ या चित्रपटातून दमदार अभिनय सादर करणाऱ्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवणाऱ्या नीना गुप्ता या ओळखल्या जातात. त्याचबरोबर त्यांच्या शिवाय काही मुद्द्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया, मते देखील त्यांच्या चाहत्यांमध्ये कायमच चर्चेचा विषय ठरते.


नीना गुप्ता सध्या त्यांच्या नव्या लूकमुळे प्रकाशझोतात आल्या आहेत. नीना गुप्ता यांनी नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्या पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये सुरेख आणि साजेशा अशा शॉर्ट हेअर लूकमध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांनी या फोटोला ‘गुगल वालों अब तो मेरी उम्र कम करके लिख लो’, असे मजेशीर कॅप्शन देत त्यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. सोबत एका खास व्यक्तीचे आभारही त्यांनी मानले आहेत.

ताहिरा कश्यप, गुल पनाक, सोनी राजदान आणि अशा बऱ्याच प्रसिद्ध चेहऱ्यांनी नीना गुप्ता यांनी पोस्ट केलेला हा फोटो पाहून कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या एव्हरग्रीन अभिनेत्रीचा सोशल मीडियावर लूक स्टाईल स्टेटमेंडही देत असल्याचे म्हणायला हरकत नाही.

Leave a Comment