मारुती सुझुकी लाँच करणार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

भारतात इलेक्ट्रिक कारचा बाजार वेगाने वाढत आहे. कार कंपन्या टाटा, एमजी मोटर्स, महिंद्रा आणि ह्युंडाई यांनी आपल्या इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. मात्र देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने अद्याप इलेक्ट्रिक कार लाँच केलेली नाही.

मारुती सुझुकी लवकरच इलेक्ट्रिक कार्समध्ये पदार्पण करणार असून, फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ऑटो एक्स्पोमध्ये कंपनी आपली इलेक्ट्रिक कार सादर करू शकते. ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असण्याची शक्यता आहे.

Image Credited – Amarujala

काही दिवसांपुर्वीच मारुतीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार फ्युचरो-ई च्या कॉन्सेप्टबद्दल माहिती दिली होती. या कारचे कॉन्सेप्ट आणि डिझाईन भारतात तयार करण्यात आलेले आहे. ही कार वॅगन आर हॅचबॅकवर आधारित आहे.

कंपनी मागील 1 वर्षांपासून याचे टेस्टिंग करत आहे. रिपोर्टनुसार, फ्यूचरो-ई मध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळेल. जे अपल कार प्ले आणि अँड्राईड ऑटो सपोर्ट असेल. या कारला रेग्युलर 15ए सॉकेटसह डीसी फास्ट चार्जरद्वारे देखील चार्ज करता येईल. बॅटरी एकदा फूल चार्ज केल्यावर जवळपास 200 किमी चालेल.

Image Credited – Amarujala

मारुती फ्यूचरो ई मध्ये कन्वेंशनल फ्रंट ग्रिलसोबत प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि एलईडी टेललाइट्स देखील मिळेल. यात एलॉय व्हिल मिळण्याची शक्यता आहे. या कारची लांबी 3655 एमएम, रूंदी 1620 एमएम आणि उंची 2435 एमएम असू शकते. या व्हिलबेस 2435 एमएम असू शकतो.

कॉन्सेप्ट फ्यूचरो-ई चा लूक एकदम नवीन आहे. कंपनीनुसार, यात यूनिक पेंट फिनिश आणि लाइट्स मिळतील. कंपनी आपल्या या इलेक्ट्रिक फ्यूचरो-ई ची किंमत 7 ते 10 लाख रुपये ठेवण्याची शक्यता आहे. कंपनी या कारची विक्री नेक्सा डिलरशीपद्वारे करू शकते.

Leave a Comment