भारतातील फेक न्यूजचा प्रसार रोखण्यासाठी गुगलने उचलले पाऊल

भारतीय नागरिकांमध्ये बातम्यांप्रती अधिक जागृकता पसरवण्यासाठी गुगलने 10 लाख डॉलर (जवळपास 7.12 कोटी रुपये) गुंतवणार असल्याची घोषणा केली आहे. गुगलने सांगितले की, ही रक्कम जागतिक ना-नफा तत्वावर काम करणारी संस्था इंटरन्यूजला देण्यात येईल. जे या योजनेसाठी 250 पत्रकार, फॅक्ट चेकर्स, तज्ञ आणि एनजीओ कार्यकर्त्यांची टीम तयार करतील.

वृत्त प्रकाशक खासकरून डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या न्यू वेबसाइट्सवर खोटी माहिती प्रसारित करण्याचा आरोप केला जात असताना, गुगलने या संदर्भात घोषणा केली आहे.

गुगलने सांगितले की, जागतिक व स्थानिक तज्ञांच्या टीमद्वारे एक पाठ्यक्रम तयार केला जाईल. जो 7 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. स्थानिक स्तरावर निवडण्यात आलेल्या लोकांद्वारे भारतातील शहरात जाऊन इंटरनेटचा वापर करणाऱ्या नवीन लोकांना प्रशिक्षण देतील. जेणेकरून ते आपल्याला येणाऱ्या माहितीचे योग्य प्रकारे आकलन करू शकतील.

खोट्या बातम्यांवर अंकुश घालण्यासाठी जवळपास 240 वरिष्ठ भारतीय पत्रकार आणि पत्रकारिता शिक्षकांचे गुगल न्यूज इनिशिटिव्ह इंडिया ट्रेनिंग नेटवर्क मागील वर्षीपासून काम करत आहे. या संस्थेने मागील वर्षी 10 भारतीय भाषांमधील 875 वृत्त संस्थांमध्ये जाऊन 15 हजारांपेक्षा अधिक भारतीय पत्रकारांना व्हेरिफिकेशन ट्रेनिंग दिली आहे.

Leave a Comment