टीक-टॉकला टक्कर देण्यासाठी गुगलने लाँच केले खास अ‍ॅप

गुगलने एक नवीन व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप टँगी (Tangi) लाँच केले आहे. हे एक प्रायोगिक अ‍ॅप असून, ज्याला गुगल एरिआ 120 अंतर्गत तयार करण्यात आले आहे. मोबाईल आणि वेब दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अ‍ॅप चालते.

टीकटॉकच्या लोकप्रियतेनंतर फेसबुकनंतर आता गुगलने देखील व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप लाँच केले आहे. मात्र हे टिकटॉकप्रमाणे केवळ एंटरटेनमेंटवर लक्ष देणारे अ‍ॅप नाही.

गुगलच्या टँगी या अ‍ॅप अंतर्गत 60 सेंकदाचा व्हिडीओ रेकॉर्ड करता येईल. हे टिकटॉकपेक्षा वेगळे आहे. कारण यात युजर्स कूकिंग, क्राफ्टिंग, मेकअप आणि क्लोदिंग असे अनेक टॉपिक्सवर व्हिडीओ बनवू शकतात.

टँगीच्या वेबसाईटवर तुम्हाला पुर्ण इंटरफेस मिळेल. सर्वात वरती वेगवेगळ्या कॅटेगरी देखील देण्यात आलेल्या आहेत. येथे 60 सेंकदाचे टूटोरियल व्हिडीओ देखील आहेत. तुम्ही त्याप्रमाणे व्हिडीओ बनवू शकता.

हे अ‍ॅप अ‍ॅपल प्ले स्टोरसाठी जारी करण्यात आले असून, अद्याप गुगल प्ले स्टोरमध्ये हे अ‍ॅप उपलब्ध नाही. सध्या या अ‍ॅपला प्रायोगिक तत्वावर लाँच करण्यात आले आहे.

Leave a Comment