हा आहे इंस्टाग्रामवर 20 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार करणारा पहिला सेलिब्रेटी

स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोने इंस्टाग्रामवर 200 मिलियन म्हणजे 20 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पुर्ण केला आहे. 20 कोटी फॉलोअर्स असणारा रोनाल्डो पहिला सेलिब्रेटी आहे.

रोनाल्डोनंतर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकन गायक एरियाना ग्रांडे आहे. तिचे इंस्टाग्रावर 17.3 कोटी फॉलोअर्स आहेत. सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या टॉप 10 मध्ये 3 फुटबॉलपटू, तीन गायक आणि तीन कलाकारांचा समावेश आहे.

रोनाल्डोने एक व्हिडीओ शेअर करत आपल्या 20 कोटी चाहत्यांचे आभार मानले. रोनाल्डोने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, वाह 20 कोटी !! माझ्यासोबत दररोज हा प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धन्यवाद.

ऑक्टोंबर 2018 मध्ये अमेरिकन सिंगर सेलेना गोमेजला मागे टाकत रोनाल्डो सर्वाधिक फॉलोअर्स असणारा सेलिब्रेटी झाला होता. सेलेना सध्या इंस्टाग्रामवर 16.7 कोटी फॉलोअर्ससह चौथ्या क्रमांकावर आहे.

इंस्टाग्राम मार्केटिंग कंपनी हॉप्पर एचक्यूनुसार, रोनाल्डो एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे 7 कोटी रुपयांची कमाई करतो. याप्रकारे तो वर्षाला केवळ इंस्टाग्रामद्वारे 3 अब्ज 78 कोटी 45 लाख रुपये कमवतो. रोनाल्डोनंतर मेस्सी इंस्टाग्रामद्वारे सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रेटी आहे.

Leave a Comment