‘थप्पड’मधील तापसी पन्नुचे फर्स्ट लुक पोस्टर रिलीज


यंदा बऱ्याच चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नु मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तापसीची दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या ‘पिंक’ आणि ‘मुल्क’ चित्रपटानंतर ‘थप्पड’ चित्रपटातही वर्णी लागली आहे. नुकतेच या चित्रपटातील तापसीचा लुक असलेले पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. तर, १ फेब्रुवारीला चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात येणार आहे.


‘थप्पड’ हा एक महिला प्रधान चित्रपट असून तो सर्व भारतीय महिलांना समर्पित असल्याचे अनुभव सिन्हा यांनी म्हटले होते. ‘बस इतनी सी बात?’, अशी टॅगलाईन चित्रपटाच्या पोस्टरवर देण्यात आली आहे. तर, यावर तापसीचाही लुक पाहायला मिळतो.

हे पोस्टर ट्विटरवर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केले आहे. या चित्रपटाची कथा प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री अमृता प्रितम यांच्या जीवनकथेवर आधारित असल्याचेही बोलले जात आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, क्रिश्न कुमार आणि अनुभव सिन्हा हे करत आहेत. २८ फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment